पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे काय बोलले?

Update: 2019-05-18 03:00 GMT

आज लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेसची पत्रकार परिषद घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या वतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपला मिळणार असल्याचं भाकीत केलं. मात्र, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तर टाळली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेसबुकवर पोस्ट टाकत खास ठाकरे शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ !

#PMPressMeet

Full View

Similar News