Pune crime ; पुणे दहशतवादी प्रकरणात सापडलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड
कोथरुड - (३० जुलै) पुण्यातील कोथरुड येथून काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या या दहशतवाद्यांची एटीएसकडून (ATS) कसून चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांच्या घरात लपवलेला एक कागद सापडला आहे. या कागदातू एटीएस विभागाला एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.
पुणे येथे पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या घरात असलेल्या फॅनमध्ये एक कागद लपवला होता. या कागदामध्ये बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया या दोघांनी हाताने लिहिलेली होती. युनस साकी आणि इम्रान खान या दोघांच्या घरात सीलींग फॅनमध्ये हा कागद सापडला आहे. ॲल्युमिनीअम पाईप बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या आहेत . या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केली होती. अशी माहिती एटीएसने दिली आहे.
१८ जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरत असताना हे दोन वॉन्टेड दहशतवादी सापडले होते. यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. तसेच दोघांना ताब्यत घेतलं आहे.
२५ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली होती. दरम्यान या तपासात आता बॉम्ब बनवण्याचा कागद देखील सापडला आहे.