भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीच्या निमित्ताने पुण्यामध्ये साड्यांचं वाटप केलंय. गोरगरीब, भांडे घासणारे, आर्थिकदृष्टया मागसलेल्या महीलांसाठी ही दिवाळीची भेट आहे असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
मात्र, निवडणुकीनंतर वैयक्तीक प्रलोभनांची पूर्तता करण्याची ही भाजपची नवीन पद्धत असल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलंय. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना महिलांना भाऊबीज द्यायचीचं असेल तर सर्व पुणेकर महिलांना द्यावी म्हणजे आपोआप त्यांचे प्रेम लाखो त्रस्त महिलांना कळेल. त्याचबरोबर भेटवस्तू वाटप हे मतदानाशी संबधीत असल्यानं निवडणूक आयोगाने याची दखलं घ्यावी अशी मागणीही आम आदमी पार्टीनं केली आहे.