10 वी, 12 वीत 80 % पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मनपाकडून मिळणार बक्षीसाची रक्कम

Update: 2021-08-18 04:40 GMT

 पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सरकारी व खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मनपाच्या नागरी विकास योजना विभागाकडून इयत्ता 10 वी 12 वी मध्ये 80 % गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कल्याणकारी योजनेतून ठरविक रक्कम बक्षीस दिली जाते .

परंतु मागील वर्षी 2020 मध्ये कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक विद्यार्थी संबंधित विभागाकडे विहित वेळेत अर्ज करू शकले नाही, अश्या विद्यार्थीनी आमदार बनसोडे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या .

आमदार बनसोडे यांनी या विषयाची तात्काळ दखल घेत आयुक्तांकडे मागील वर्षी राहिलेल्या विद्यार्थीचे अर्ज परत भरून घ्या , अशी मागणी केली. आमदार बनसोडे यांच्या मागणीची दखल घेत नागरी वस्ती विभागातर्फे मागील वर्षी (2020-21) राहिलेल्या विद्यार्थीनी चालू वर्षात अर्ज करावे असे प्रसिद्धी पत्रक मनपाने काढले आहे. दरम्यान आमदार बनसोडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत पाठपुरावा केल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले आहे.

Tags:    

Similar News