नांदेडमधील लोहा शिवसेनेकडेच... चिखलीकरांचे समर्थक संतप्त

Update: 2019-10-01 11:23 GMT

शिवसेना- भाजपच्या जागा वाटपात लोहा कंधार हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. प्रविण चिखलीकर यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची मागणी आहे मागच्या वेळी प्रतापराव चिखलीकर हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढले होते पण त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोहा ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. नांदेड मधील वसंतनगरात जमलेल्या चिखलीकर समर्थकांनी काहीही झाल तरी लोहा कंधार तो है हमाराचा नारा दिलाय. लोहा कंधार मधून प्रवीण पाटील यांनाच उमेदवारी दिली जावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दोन दिवसांची वेळ द्या, मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवा असं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे.

https://youtu.be/3LKfUAAlwz4

शिवसेना-भाजप जागा वाटपात लोहा हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेच्या कोट्यात आहे. याच लोहा मधून गेल्या वेळी स्वतः प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार झाले होते. कालांतराने चिखलीकर भाजपात गेले आणि लोकसभेला निवडून आले. मात्र त्यानंतर लोहा हा मतदारसंघ भाजपला सोडावा असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. मात्र सेनेने त्यास नकार देत लोहा मधून मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले चिखलीकर आज एकत्र आले. लोहा आणि नांदेड दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ आपल्याचकडे ठेवावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Similar News