सत्तेत समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रातील मंत्रीपदाबाबत निर्णय घेणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार असेल, असा दावा दानवेंनी यावेळी केला. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभेवेळी जी चर्चा झाली, ती त्या दोघांनाच माहिती आहे. पण सरकार मात्र युतीचे राहील, असा ठाम विश्वास दानवेंनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना व्यक्त केला.
"संजय राऊत किंवा रावसाहेब दानवे काय म्हणतात यापेक्षा उद्धव ठाकरे आणि अमित शाह काय म्हणतात याकडे जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. तसेच नेत्यांच्या निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते एकत्र बसून युती करताना जे ठरलं आहे त्याप्रमाणे निर्णय घेतील,