राजकीय पक्षांना मिळाला 1100 कोटी रुपयांचा फंड, भाजपला सर्वाधिक 611 कोटी रुपये फंड

Update: 2021-12-04 05:08 GMT

नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप आणि इतर 19 पक्षांना या वर्षी झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत तब्बल 1100 कोटी रुपयांचा फंड मिळाल्याच समोर आलं आहे. त्यातील जवळपास 500 कोटी रुपयांचा फंड स्टार प्रचारकांवर आणि निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर खर्च झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे.

या वर्षी आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये 19 पक्षांना 1100 कोटी रुपयांचा फंड मिळाला. त्यात सर्वाधिक फंड हा भाजपच्या वाट्याला आला. भाजपला 611.69 कोटी रुपये इतका फंड मिळाला. भाजपने यातील 252 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने यापैकी 85.26 कोटी रुपये हे स्टार प्रचारकांवर खर्च केलेत तर 61.73 कोटी रुपये हे नेत्यांच्या दौऱ्यावर खर्च केलेत.

तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 193.77 कोटी रुपये फंड मिळाला. त्यापैकी काँग्रेसने 85.62 कोटी रुपये खर्च केले. त्यात 31.45 कोटी रुपये प्रचारावर आणि 20.40 कोटी रुपये नेत्यांच्या दौऱ्यावर खर्च करण्यात आला. फंड मिळवण्याबाबत द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांचा तिसरा क्रमांक असून या पक्षाला 134 कोटी रुपये फंड मिळाला. तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला 56.32 कोटी रुपये मिळाले. मोकपला त्यापेक्षा जास्त म्हणजे 79.24 कोटी रुपये फंड म्हणून मिळाले.

Tags:    

Similar News