नितेश राणे यांची विजयादशमीनिमित्त स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला हजेरी

Update: 2019-10-08 10:27 GMT

एरवी नितेश राणे आपल्या रोखठोक आणि धडाडीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, ते मंगळवारी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडी घालून जमिनीवर बसल्याचे दिसून आले. साहजिकच हे पाहून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातील संस्कृती तेवढीशी मानवली नव्हती. मात्र, नितेश राणे यांनी कालाय तस्मै नम: म्हणत स्वत:मध्ये बदल केल्याचे दिसत आहे.

या कार्यक्रमाला नितेश यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे देखील उपस्थित होते. जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. मात्र, यावेळी कार्यक्रमातील नितेश राणे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

Similar News