राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

Update: 2021-09-04 06:57 GMT

नांदेड : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाई, जन सामान्यांचे प्रश्न घेऊन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाच्या विरोधात तसेच केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या जन विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. 

 आंदोलनामध्ये अनेकांची उपस्थिती होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. हा रस्ता रोको आंदोलन नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दीड तास सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

जर केंद्र सरकारने महागाई ,पेट्रोल - डिझेल दरवाढ याच्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही तर यापुढे याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते दिनकर दहिफळे यांनी दिला आहे. 

Tags:    

Similar News