उदयनराजे भोसले यांचा पत्रकारांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबत २१ नोव्हेंबरला साताऱ्याची पोटनिवडणुक घोषित केली आहे. सातारा पोटनिवडणुकी विषयी बोलताना शरद पवार यांचा विषय येताच उदयनराजे भावुक झाले आणि शरद पवार येथून निवडणुक लढवणार असल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्जही भरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
VIDEO : शरद पवार साताऱ्यात उदयनराजेंबाबत काय बोलले पाहा
ही बातमी देऊ शकते उदयनराजेंना मोठा दिलासा...
याच व्हिडीओ संबंधित आपलं मत मांडताना जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांनी भाजप प्रवेशानंतर अंतर्गत राजकारणामुळे उदयनराजे यांची कोंडी होत असुन उदयनराजे हे स्वतःच एक पक्ष आहेत. त्यांनी कोणत्याच पक्षात न जाता आपला पक्ष उभा केला असता तर सर्व जनता त्यांच्यासोबत उभी राहिली असती. पण त्यांना स्वतःचा पक्ष स्थापन करायचा नसला तरी वंचित, शोषित रयतेसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा अशी विनंती केली आहे. नुकताच नामदेवराव जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असुन उदयनराजेंनीही आपल्यासोबत येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/ProNamdevraoJadhav/videos/734011970434697/?t=329