एकीकडे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प राबवले जात आहेत. मुबंईत मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पांची कामही जोमाने सुरु आहे. मात्र दुसरीकडे मुलभूत सुविधांचीही वानवा आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई महानगरपालिकेच्या भोंगळ कामाचं पितळ उघडं पडतं. रस्ते आणि स्थानिक वस्त्यांमध्ये पाणी तुंबणं, रस्त्यावर खड्डे पडणं, रेल्वे सेवा ठप्प होणं, इमारती कोसळणं या आणि अशा अनेक घटनांमुळे जनताही त्रस्त झाली आहे.
एकूणच या सर्व समस्यांवर पर्याय म्हणून मुंबई केंद्रशासित झाली पाहिजे का असा सुरु उमटतो आहे. याच विषयास अनुसरून ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी आपलं व्यक्त केलं आहे...पाहा व्हिडीओ
https://youtu.be/oMZe1Pdye_M