अशी केली मनसेनं राष्ट्रवादीची परतफेड

Update: 2019-10-07 10:22 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अघोषित आघाडीने निवडणुकांची रंगत चांगलीच वाढत आहे.

पुण्याच्या बहुचर्चीत कोथरूड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या मनसेच्या किशोर शिंदे यांना राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेत जाहीर पाठींबा दर्शवला होता याचीच परतफेड आता मनसेनंही केली आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघातुन मनसेचे अशोक मुर्तडक यांनी राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठींबा देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे बंडखोर नेते असून या निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत.

अशोक मुर्तडक यांनी आपली उमेदवारी मागे घेताना पक्षाने मला बरचं काही दिलं असल्याचं सांगत साहेबांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं म्हटलं आहे. एकूणच आता नाशिकच्या राजकारणाचीही रंगत वाढली असून मनसेनं आपलं ऋण उतरवलं असल्याचं चित्र दिसत आहे.

Similar News