गेले चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज दोन दिवसाच्या अतिवृष्टी दौर्यावर जाणार आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी खासदार शरद पवार हे बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत.
रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा तुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.