सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापनविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटने पत्रकारीता विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या "Knowing RSS" या उपक्रमाला उपस्थित राहावे अशी नोटीस बजावल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रीया उमटायला सुरूवात झाली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची दखल घेत महाविकास आघाडीचं सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही अशा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
‘भाजप सरकारच्या आशिर्वादाने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रचार, प्रसार करत आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठ निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी RSS चा स्वयंसेवक व्हावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
https://twitter.com/bb_thorat/status/1228018301386641409?s=20
यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असून याविषयी योग्य ती कारवाई केली जाईल असंही थोरात यांनी सांगितलं आहे.