महाराष्ट्रातील रोजगार निर्मितीत १.७ टक्क्यांची घट 

Update: 2019-04-23 05:05 GMT

दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण होणं तर दूरच मात्र दिवसेंदिवस रोजगार निर्मितीत घट होत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय.

२०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात रोजगार निर्मितीत १.८ टक्क्यांनी घटल्याचे समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे असलेल्या (एसिक) कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या माहितीवरून असं स्पष्ट झाले आहे की, फेब्रुवारीत रोजगाराची संख्या घटून १५.३ लाख इतकी झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात ही संख्या १५.३० लाख इतकी होती. सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कामगार राज्य विमा योजनेअंतर्गत महामंडळाकडे सुमारे ३ कोटी नवीन कामगारांची नोंदणी झाली. या आस्थापनेमध्ये २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी आहेत आणि त्यांचे मासिक वेतन २१ हजार रूपयांपर्यंत आहेत, अशा नोंदणीतून कामगारांना एसिककडून आरोग्य विमा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. एसिक कडील आकडेवारीनुसार जुलै २०१८ मध्ये सर्वाधिक १९.८१ लाख नवीन कामगारांची नोंदणी झाली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार मात्र फेब्रुवारी २०-१९ संघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती वाढल्याचे दिसते. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये २.८७ लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा ८.६१ लाख इतका झाल्याचे ईपीएफओच्या आकडेवारीत दिसत आहे. सातत्यानं रोजगार निर्मितीत होणा-या घसरणीचा परिणाम यंदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल, असा मतप्रवाह अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषकांच्या वर्तुळात दिसून आला आहे.

 

Similar News