शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत उद्धव ठाकरे कधीही झुकणार नाहीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असंही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हटले.
त्याचबरॊबर राज्यपालांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता उद्यापासून राज्यपाल राज्याचे प्रमुख असतील, राज्यपाल या राज्याचे पालक आहेत,त्यामुळे सल्लामसलतीसाठी त्यांच्याकडे जावं लागेल, तर आज भेटणार नाही मात्र लवकरच आम्ही त्यांना भेटू असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं आहे.