सातारा जिल्ह्यात दोनही राज घराण्यातील व्यक्तींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून दिपक पवार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. दिपक पवार हे भाजप मध्ये होते. त्यांनी शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आम्ही आमच्या मला आमदार का व्हायचंय या कार्यक्रमात दिपक पवार यांच्याशी बातचित केली.
यावेळी दिपक पवार यांनी ‘ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यासोबत फक्त चार कॉन्ट्रॅक्टर गेले आहेत. जनता माझ्यासोबत आहे. जनतेला दोनही राजेंचे पक्षांतर रुजलेले नाही. त्यामुळे मी निवडून येऊन साताऱ्याला गोळीबार मुक्त करणार. असा विश्वास ३६२ सातारा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे. पाहुयात काय म्हणाले दिपक पवार...
https://youtu.be/UITUvBp0j8Y