मोदींच्या प्रचाराला महाराष्ट्राची टीम

Update: 2019-05-05 02:46 GMT

महाराष्ट्र भाजपाच्या एका टीमला उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे तसंच इतर नेत्यांच्या सोबत एक तुकडी उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी पाठवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. या टीमची जबाबदारी संजय उपाध्याय यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रचारामध्ये ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत. त्या पद्धतीने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूका संपलेल्या आहेत. त्या त्या राज्यातील कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी बोलावण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते वाराणसी लोकसभा क्षेत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्या मतदारसंघात जात आहेत.

Similar News