मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा? भाजपा शिवसेनेच्या उमेदवाराला विचारला म्हणून एका तरुणाला अटक केल्याचा प्रकार दुसऱ्या कोणत्या राज्यात नाही तर महाराष्ट्रात घडला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमरावतीच्या जरूड इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका तरूणाने आमदार अनिल बोंडे यांना विकासकामासंदर्भात काही प्रश्न विचारल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. गोंधळानंतरही नेत्यांनी आपली भाषणं सुरूच ठेवल्याचंही पाहायला मिळालं.
दरम्यान तरुणानं सरकारच्या प्रतिनिधींना गेल्या पाच वर्षात नक्की काय विकास झाला? हा प्रश्न विचारला म्हणून पोलिसांनी अटक केल्याने प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात न्यूज 18 ने वृत्त दिले आहे.