मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित दादा 1 लाख मतांनी निवडून आले - शरद पवार
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मोदींच्या सभांची खिल्ली उडवली आहे.
'गेल्या विधानसभेला नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित दादा 1 लाख मतांनी निवडून आले. त्याआधी ते 60 ते 65 हजारांनी निवडून यायचे. आतादेखील नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मला चिंता नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार,' असं म्हणत शरद पवार यांनी ज्या ठिकाणी मोदी सभा होतात, त्या ठिकाणचा उमेदवार पडतो. असं सांगण्याचा प्रयत्न केला.