महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केल्याबद्दल जनतेची माफी मागा

सुशांतसिंह प्रकरणात भाजपाने महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केल्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Update: 2021-08-05 06:34 GMT

सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १७७ कलमाचे उल्लंघन केले होते असे सावंत यांनी स्पष्ट केलं.



सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु

मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता.

गुप्तेश्वर पांडेचा वापर याकरिता केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला.

मविआ सरकारवरील या सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती अशी होती...

भाजपा संचालीत वाहिन्यांनी खुन झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगीतले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केला.



एम्स पॅनेलने हत्येला नकार देऊन आता 300 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय अजूनही मुद्दाम मौन बाळगत आहे, असे सावंत म्हणाले.


राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या मृत्यूच्या तपासाच्या या चेष्टेतून मोदी सरकारकडून या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी कसा वापर केला जात आहे हे स्पष्ट होते. भाजपाने या प्रकरणात महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे.

Tags:    

Similar News