सरकार स्थापनेवरुन शिवसेना भाजपचे वाद अजूनही संपलेले नाहीत. त्यातच महायुतीचे मित्रपक्षही नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच संदर्भात आज अविनाश महातेकर यांच्या निवासस्थानी मित्र पक्षांची बैठक पार पडली यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्र्यांची विधीमंडळ नेते पदी निवड झाली त्या संदर्भात अभिनंदन प्रस्ताव ठेवला आणि या चारही घटक पक्षांना राजकीय प्रतिनिधीत्व मिळावं या साठीच आजची बैठक होती. धनगर समाजाला आरक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. तर मुख्यमंत्री पदाचा वाद हा उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येवून सोडवतील.” अशी प्रतिक्रीया जानकर यांनी दिली आहे.
https://youtu.be/m0ZDZ9agjRY