काहीच प्रायव्हेट राहणार नाही का? फोटो नाही काढू दिला म्हणून ९० पाऊंडांचा दंड

Update: 2019-05-16 06:59 GMT

पूर्व लंडनमध्ये चेहरेपट्टी ओळखणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांची चाचणी सुरू असताना स्वतःचा चेहरा झाकला म्हणून एका नागरिकास ९० पाऊंड इतका दंड भरावा लागला आहे.

फेशिअल रिकग्नायझेशन तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरांची चाचणी सध्या पूर्व लंडन मध्ये सुरू आहे. यासाठी कॅमेरांनी सज्ज एक व्हॅन रस्त्यात उभी करण्यात आलीय. ही व्हॅन पाहून एका नागरिकाने स्वतःचा चेहरा झाकून घेतला. चेहरा झाकणाऱ्या नागरिकास पोलीसांनी हटकले आणि त्याचे फोटो काढले. पोलीसी कारवाईत अडथळे आणले म्हणून या नागरिकाला ९० पाऊंडांचा दंड ही करण्यात आला आहे.

अशा पद्धतीचं कृत्य म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला असून तुमच्या कुठल्याच हालचाली या स्वंतंत्र, खाजगी राहू शकत नाहीयत का असा सवाल या नागरिकाने उपस्थित केला आहे.

पूर्व लंडन मधल्या या सीसीटीव्ही चाचणीच्या दरम्यान चेहरेपट्टी ओळखणाऱ्या या कॅमेरांमुळे तीन आरोपी मात्र पोलिसांच्या गळाला लागले आहेत. हे कॅमेरे कुठल्याही चेहऱ्याचं विश्लेषण करून त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रीय डाटाबेस शी पडताळणी करून बघतात. यामुळे अनेक गुन्हेगार किंवा संशयितांना पकडणं सोप्पं जाणार आहे.

Similar News