निवडणूकीत निवडून येण्यासाठी उमेदवार साम, दाम, दंड भेदचा वापर करतो. निवडणूकीच्या काळात हे सर्व प्रकार घडत असतात. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडत असतो. त्यातली त्यात निवडणूकीत पैसा, सोने, आणि दारुसारखे उत्तेजनात्मक पेय्य याचा वापर उमेदवारांना प्रलोभन देण्यासाठी केला जातो. त्यामुळे प्रचाराच्या या रणधुमाळीत भारतीय लोकशाहीत निवडणूक म्हटले की अशा गोष्टींनाही पुष्कळ जोर येतो. त्यामुळे निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा यांचे काम या कालावधीत वाढते. निवडणुका शांततेत पार पडण्याच्या कठीण आव्हानासह त्या कालावधीत गैरप्रकारांना खतपाणी घालण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या मुद्देमालावरही करडी नजर ठेवावी लागते. अशा वेळी भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा हे सर्व नेतेमंडळी बाहेर काढत मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, प्रशासन या प्रकारांवर करडी नजर ठेवत असते. आज दिवसभरात देशात तब्बल 1354 कोटींची प्रशासनानं रक्कम जप्त केली आहे.
यामध्ये सर्वाधिक किंमतीचा माल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमटाऊन असलेल्या गुजरातमध्य जप्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 509 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये तब्बल 100 किलो ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. या ड्रग्जची किंमत 500 कोटी रुपये आहे. तर पूर्ण गुजरात राज्यात 3.38 कोट रुपयाची कॅश पकडण्यात आली आहे. तर दुसरीकडे 6 कोटी 24 लाख रुपयाची 2 लाख 22 हजार लिटर दारु देखील पकडली गेली आहे.
गुजरातनंतर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रक्कम पकडण्यात आली आहे. यामध्ये अवैध कॅश रक्कम, सोने, दारु यांचा समावेश असून ही पूर्ण रक्कम 185 कोटी रुपये आहे.तामिळनाडू मधून 91 कोटी 01 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 88 कोटींच्या 684 किलो सोन्यासह इतर मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले आहेत.
तामिळनाडू नंतर आंध्रप्रदेश मधून 152 कोटी 62 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 92 कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. तर 20 कोटी 7 लाख रुपयांची दारु जप्त केली असून 29 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. आंध्रप्रदेशमध्ये जवळ जवळ 152 कोटी 62 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
वरील तीन राज्य़ात सर्वाधिक रक्कम जप्त करण्यात आली असून महाराष्ट्रात एकूण 63 कोटी रुपयाची रक्कम जप्त केली आहे. तर दुसरीकडे 12 कोटी 79 लाख रुपयाची दारु पकडण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 14 हजार 303 किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून या ड्रग्जची किंमत 3 कोटी 83 लाख रुपये आहे.
देशात पकडण्यात आलेली एकूण रक्कम - 1352 कोटी
पैसा कॅश स्वरुपात – 293 कोटी 939 लाख
दारु स्वरुपात - 129 कोटी 668 लाख
ड्रग्ज / नॅरॉक्टिक्स - 679 कोटी 10 लाख रुपये
सोने/ चांदी इतर दागीने – 22 कोटी 99 लाख
[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]अशा पद्धतीने या राज्यासह इतर राज्यातही रक्कम पकडण्यात आली आहे.[/button]