लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यासाठी राजधानी दिल्लीतील ७ जागांसह ५९ मतदारसंघात रविवारी आज मतदान पार पडलं. या ५९ मतदारसंघापैकी उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामधील मतदान हे भाजप आणि विरोधी आघाडीच्यादृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व म्हणजे १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील सर्व म्हणजे ७ आणि झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१४ मध्ये या ५९ मतदारसंघापैकी भाजपनं ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा कायम राखण्याचं त्यांच्यापुढं आव्हान असणाराय.
त्या दृष्टीने साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर लोकांच्या भावना आणि निवडणुकीचे मुद्दे भरकटत आहेत का? यावर मांडलेले मत