झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी झालेल्या 5 टप्प्यातील मतदानानंतर आज निकाल लागत आहेत. झारखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस- झारखंड मुक्ती मोर्चा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आघाडी अशी लढत होत आहे. झारखंड विधानसभेमध्ये बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहे.
सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार झारखंड मध्ये सध्या ‘काँग्रेस-झामुमो-राजद आघाडी’ 40 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजप 29 जागांवर आघाडीवर आहे. सध्याचे कल पाहता एका वर्षात झारखंडच्या हातातून पाचवं राज्य गेलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राजीनामा दिल्यानंतर आणि आता जर झारखंड मध्ये पराभव झाला तर आणखी एका राज्यातील सत्ता भाजपच्या हातून निसटेल. त्यामुळे भाजपची 15 राज्यांतच सत्ता राहू शकते. तर १४ राज्य व केंद्रशासित प्रदेशात भाजपे इतर पक्षांची सत्ता आहे.
भाजपची सत्ता असलेली राज्य
गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, बिहार (आघाडी), मिझारोम (मित्रपक्षासह), नागालँड (मित्रपक्षासह), हरयाणा (मित्रपक्षासह), मेघालय (मित्रपक्षासह)
भाजप इतर सत्ता असलेली राज्य
महाराष्ट्र (महाविकास आघाडी), मध्य प्रदेश (काँग्रेस), राजस्थान (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), पुड्डुचेरी (काँग्रेस),छत्तीसगड (काँग्रेस) तर पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस), आंध्र प्रदेश (वायएसआर), तमिळनाडू (अभाअद्रमुक), तेलंगण (टीआरएस), ओडीशा (बिजद), केरळ (माकप), दिल्ली (आप), सिक्कीम (एसकेएम) या पक्षांची सत्ता आहे.
आणि आता जर झारखंड मध्ये सत्ता आली तर भाजपच्या हातून आणखी एक राज्य जाऊ शकते.
झारखंडमध्ये सध्या भाजपचे रघुवर दास मुख्यमंत्री आहेत. झारखंड ची निर्मिती 2000 साली करण्यात आली होती. बिहारमधून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली होती.
कधी झालं होतं मतदान?
झारखंड विधानसभे साठी 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं होतं.
पहिल्या टप्प्यात 13
दुसऱ्या टप्प्यात 20
तिसऱ्या टप्प्यात 17
चौथ्या टप्प्यात 15
पाचव्या टप्प्यात 16
अशा एकूण 81 जागांसाठी मतदान पडलं होतं.