स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात, अशी ताकद कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीत आहे, पण विकास योजना आखताना ती विचारात घेतली जात नाही. उलट पर्यावरणाचा ऱ्हास करणारा विकास कोकणच्या मानगुटीवर बसलाय. इथल्या लोकांशी बोलताना हीच बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. पायवाटांत अडकून पडलेल्या विकासाच्या शहरी संकल्पनेने कोकणसारखा निसर्गसमृध्द प्रदेश गिळायला घेतलाय. ही खंत लोकांच्या बोलण्यात आहे. ईश्वरचंद्र हलगरे सारखा कवी कोकणचा कॅलिफोर्निया या कवितेत कोकणवासियांची व्यथा नेमकेपणाने मांडतो आणि लोकांनी बाकी चुकवायची वेळ येऊन ठेपलीय, असा सूचक इशाराही देतो. ऐका, मॅक्समहाराष्ट्र चा जनतेचा जाहिरनामा गुहागर विधानसभा मतदारसंघातून...राज असरोंडकर यांच्यासोबत