महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला जुंपले आहेत. कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार यावर सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांमध्ये धाकधूक आहे.
गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी आमदारांची कामगिरी आणि लोकांच्या समस्यांचा लेखाजोखा खुद्द मतदार राजाकडुन जाणुन घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जनतेचा जाहीरनामा...
आज आपण आहोत मानखुर्द (पश्चिम) मधील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या मतदारसंघातील मतदारांसोबत...या विभागात गेल्या पाच वर्षात विकासकामं झालीच नाहीत. गेली पाच वर्ष आमदार फिरकलेच नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे. काय आहे मानखुर्द च्या जनतेचा जाहीरनामा...पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/507918436434439/?t=3