ओमीक्रॉनला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे का?, तज्ज्ञ म्हणतात....
मुंबई : कोरोना व्हायरसच्या नवा व्हेरिएंटने देशात हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. ओमीक्रॉन डेल्टा व्हेरिअंटपेक्षा तिप्पटीने जास्त वेगवान असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ओमीक्रॉनच्या वेगाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे का? सरकारला तिसऱ्या डोसवर विचार केला पाहिजे का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत इंन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, कोरोना लस कोणत्याही व्हेरिअएंटविरोधात फायदेशीर आहे. म्हणजेच कोरोना लस घेतलेला व्यक्ती लस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त सुरक्षित आहे. सोबतच दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. कारण , ज्यांनी एक डोस घेतला आहे त्यांनी लवकर दुसरा डोस घ्यावा. अन्यथा त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. देशात अद्यापही १५ टक्के असे लोक आहेत, ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही. बुस्टर डोसपेक्षा लसीकरण न झालेल्या लोकांना लस देणे सध्या गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.