हिमालयात जीवन व्यतीत करणाऱ्या मोदींना रेड कार्पेटची गरज काय? सोशल मीडियावर मोदींना झोडपले

Update: 2019-05-18 15:49 GMT

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातीसल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर रवाना झाले. तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शाह सोमनाथ मंदीराच्या दर्शनाला गेले आहेत. तर निवडणूक काशी आणि उज्जैन या मतदारसंघात आहे. मोदींच्या या दौऱ्याचा विचार केला तर ही चारही स्थळ ज्योतिर्लिंग आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता मध्ये शिव-चंडी अवतार कालिमाता आहे. मोदींच्या या दौ-याचा फायदा वाराणसी, उज्जैन, कोलकाता, हिमाचलमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मोदींनी या दौऱ्यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवलं आहे.

आज सकाळी मोदी केदारनाथला पोहोचल्यानंतर त्यांचे रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. हिमालयाच्या गुफेत राहिलेल्या माणसाला रेड कार्पेटची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे देशात दुष्काळ, बेरोजगारी, आर्थिक मंदी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं सुचतंच कसं? असा सवाल देखील उपस्थित केला जात असून एका पंतप्रधानाचं कर्तव्य हे देशाचा कारभार चालवणं असतं. मात्र, देश संकटात असताना पंतप्रधान ज्या पद्धतीने देव धर्म करत आहेत. त्याचा विचार करता मोदींनी संन्यास घ्यायला हवा असं देखील काही नेटिझन्सचं मत आहे. एकंदरीत मोदींच्या या दौऱ्यावर सोशल मीडियावर सवाल उपस्थित केला जात असून मोदींना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Full View

Similar News