वाड्रा असो नाही तर राफेल चौकशी झालीच पाहिजे – राहुल गांधी

Update: 2019-05-17 03:40 GMT

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कुणालाच सोडता कामा नये. वाड्रा असो नाहीतर राफेल चौकशी झाली पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी 'द वायर' या पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

देशात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, पण आम्ही विविध स्तरांवर आघाड्या जरूर करत आहोत. देशात नरेंद्र मोदींच्या विरोधात वातावरण असून आता लोक या सरकारला वैतागलेयत असं ही राहुल गांधी यांनी सांगीतलं.

२३ तारखेला काँग्रेस जिंकेल, आघाडीचं सरकार बनेल. नरेंद्र मोदींनी या निवडणूकीत मोदी, फिरसे मोदी, देशभक्ती, मग नेहरू-गांधी परिवार या भोवती मोदींचा प्रचार फिरत राहिला आहे. विकासाच्या मुद्द्यावर, केलेल्या कामावर लढत नाहीयत यातच सगळं आलंय असं ही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

मी हातात कागद न घेता मुलाखती देतो, पण मोदी तसं करत नाहीत. मोदी तसं करत नाहीत, लोकांच्या प्रश्नांना उत्तर ते देऊ शकत नाहीत. कारण राफेलच्या मुद्द्यावर प्रश्नांना घाबरतात असं राहुल यांनी सांगीतलं.

पुलवामा प्रश्नाला राजकीय रंग काँग्रेस देणार नाही, शहीदांचा वापर राजकारणासाठी केला जाणार नाही, आम्ही सरकारच्या सोबत आहोत असं मी जाहीर केलं पण नरेंद्र मोदी तसं करत नाहीत. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मोदींनी ताज च्या बाहेर उभं सरकारवर टीका केली होती.

काँग्रेस मोदींच्या विरोधात प्रामाणिकपणे लढलीय, आम्ही लोकांचे प्रश्न ऐकले आणि म्हणून आम्ही लढू शकलो. मुख्यप्रवाहातील माध्यमं लढली नाहीत हे ही पाहायला पाहिजे असं राहुल यांनी आपल्या मुलाखतीत सांगीतलं.

Similar News