कोरोनावरील लस : भारतासाठी गुड न्यूज

Update: 2020-12-28 13:59 GMT

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनावरील लस नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. पण भारतात लस प्रत्यक्षात कधी येणार असा प्रश्न असताना आता सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी एक गुड न्यूज दिली आहे. जानेवारीमध्ये कोवीशिल्ड लस प्रत्यक्ष वापरात येऊ शकते अशी माहिती पुनावाला यांनी दिली आहे. तर भारताला सुरूवातीला ४ ते ५ कोटी डोस मिळतील असेही पुनावाला यांनी सांगितले आहे. एकदा का औषध नियामकांची मंजुरी मिळाली तर लस कधी वापरात आणायची आणि लवकरात लवकर लसीचे किती डोस घ्यायचे हे सरकारला ठरवावे लागेल, असेही पुनावाला यांनी सांगितले. जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी लसींची निर्मिती केली जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले. पण २०२१ च्या सुरूवातीच्या ६ महिन्यांमध्ये कोरोनावरील लसीचा संपूर्ण जगभरात तुटवडा जाणवेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या लसीला मान्यता मिळण्यासाठी उशीर का लागत आहे याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, नियामक सध्या डाटा तपासत आहेत कारण काही जणांनी आक्षेप घेतले आहे. पण लसीचे निष्कर्ष ९२ ते ९५ टक्के सकारात्मक असल्याने लसीला लवकरच मान्यता मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News