राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू आहे. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले आहेत.
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार सकाळी अकरा वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.
यावेळी शरद पवार यांनी नासाडी झालेल्या पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचित करुन त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी शरद पवार यांच्यासोबतत स्थानिक आमदारही होत. पवार आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच नुकसानग्रस्त भागाला भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं.