आम्ही अँटीनॅशनल

Update: 2019-05-17 03:06 GMT

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भाजपा उमेदवार आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंह वर सोशल मिडीयात सर्व स्थरातून टीका होत आहे. नथुरामच्या मुद्द्यावर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी ही होत आहे.

प्रियांका गांधींनी भाजपाला घेरलं -

बापू का हत्यारा देशभक्त?

हे राम!

तुमच्या उमेदवाराच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचा खुलासा करणंच पुरेसे नाही, तर देशभक्तीचा आव आणणाऱ्या भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे.

जर नथुराम गोडसे देशभक्त असेल तर मला देशद्रोही म्हणवून घ्यायला आवडेल अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे.

बंगालमधला कोणीही माणूस ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याला हात लावू शकत नाही, हे काम फक्त बाहेरची माणसंच करू शकतात, आणि बाहेरची माणसं कुणी आणलीयत हे सगळ्यांना माहित आहे, अशा शब्दांत चिदंबरम यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टी सतत वादग्रस्त मुद्दे उकरून काढतेय. यावरून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी भाजपवर टीका केलीय. नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांनीही नथुराम गोडसेला देशभक्त ठरवणाऱ्या प्रज्ञा सिंह वर टीका केलीय.

ओमर यांनी म्हटलंय की, जर राष्ट्रपित्याला मारणं ही देशभक्ती आहे तर महात्मा गांधी देशद्रोही होते का...?

Similar News