संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर काल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
कोरोनाच्या महामारीत हे सरकार ऊसतोड कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप धस यांनी केलाय. या कामगारांसाठी असे हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी ते अंगावर घ्यायला तयार आहे, असंही धस म्हणालेत. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती. ऊसतोड मजूरांसाठी सरकारने 50 लाख रुपयांचा विमा उतरावा अशी मागणीही त्यांनी केलीय.