सरकारने गाव जत्रा व तमाशाला परवानगी द्यावी - रघुवीर खेडकर

गाव जत्रा आणि तमाशाला सुरू करण्याची परवानगी देऊन सरकारने तमाशा कलावंतांची होणारी फरपट थांबवावी अशी विनंती तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

Update: 2021-08-25 14:33 GMT

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक गोष्टींना काही नियम अटींसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यापद्धतीने गाव जत्रा ,तमाशा पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी व कलावंतांना रोजी रोटीसाठीची भटकंती थांबवावी अशी विनंती तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हा कलावंतांच्या प्रत्येक प्रश्नाकडे याआधी जातीने लक्ष घातले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण यापुढेही ज्या पद्धतीने बाजारपेठा सुरू झाल्या आहे, सार्वजनिक व्यवस्था सुरू झाली आहे त्याच पद्धतीने गाव जत्रा ,तमाशा सुरू करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

तमाशा कलावंतचे पोट गाव जत्रांवरच भरते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत्रा बंद झाल्या आहे. परिणामी तमाशा देखील बंद आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता इतर सुविधांप्रमाणेच गाव जत्रा सुरू कराव्या अशी भावना तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News