लोकसभा निवडणूकीसाठी गुगलचं खास डुडल

Update: 2019-04-11 01:51 GMT

भारतात आज लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलनं खास डुडलं बनवलंय. यात मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय मतदान कसं करावं, यासंदर्भातही गुगलनं सविस्तर माहिती दिलेली आहे.

मतदान करतांना या गोष्टी लक्षात ठेवा

- मतदान केंद्रावरील अधिकारी तुमचं मतदार यादीतील नाव पाहतील, त्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहतील, मग तुमच्या हाताचे ठसे लिंक केले जातील

- हाताचे ठसे लिंक झाल्यावर अधिकारी तुम्हांला एक पावती देतील, त्यानंतर तुमची स्वाक्षरी घेतील (फॉर्म १७अ)

- ती पावती तुम्हांला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल, त्यांना तुम्ही मतदान केलेलं बोट दाखवावं लागेल, त्यामुळं तुम्ही मतदान केल्याचं रेकॉर्ड त्यांच्याजवळ असेल

- मतदान करतांना तुम्ही तुमच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर मतदान यंत्रातून एक आवाज येईल, त्यानंतर व्हीव्हीपॅटमशीनमध्ये तुम्ही कुणाला मतदान केलं हे दिसेल

- तुम्ही मतदान केल्यानंतर ज्या उमेदवाराला मतदान केलंय त्याचा मतपत्रिकेवरील क्रमांक, नाव, पक्षाचं चिन्हं तुम्हांला व्हीव्हीपॅटमध्ये ७ सेकंदांसाठी दिसेल, त्यानंतर व्हीव्हीपॅटमधून आलेली ती पावती सील केलेल्या व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये टाकली जाईल.

Similar News