अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या गाड्यांच्या ताफ्यात 1.80 कोटी रुपये जप्त केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस पैशाचा वापर मत खरेदी करण्यासाठी करत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यामुळे चौकादारीची चोरी रंगेहात पकडली आहे, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला.
“पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीतून रात्री 12 च्या सुमारास ही रोकड जप्त करण्यात आली. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यामुळे या घटनांचा निश्चितच एकमेकांशी संबंध आहे. भाजपने कॅश फॉर वोट घोटाळा केला आहे. पैसे घ्या, मत द्या ही पंतप्रधान मोदींची घोषणा आहे”, असा गंभीर आरोप कॉंग्रेसने केला आहे.