केंद्र सरकारने लागू केलेल्या शेती सुधारणा कायद्यांना विरोध करण्यासाठी मुंबईत शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. शेतकरी संघटनांनी रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलिसांनी या आंदोलनाच्या ठिकाणी बॅरेकेडींग करून आंदोलन कर्त्यांना थोपवून ठेवल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबईत स्वाभिमानी शेतकरी, प्रहार आदी संघटना एकत्र आल्या आहेत. या आंदोलनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी कायद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक आंदोलकांनी डफली वाजवून या कायद्यांचा निषेध केला. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर, पोलिसांना त्यांना थोपवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हा मोर्चा रिलायन्स जिओच्या कार्यालयावर धडकणार होता. वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी, रविकांत तुपकर, बाबा आढाव, जयंत पाटील आदी शेतकरी नेते उपस्थित होते.
मुंबईतील बीकेसी येथे अंबानी कार्पोरेट हाऊसवर शेतकर्यांचा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये सकाळापसून विविध शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला... हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.... केंद्र सरकारने तिन्ही शेतकरी कायदे मागे घ्यावेत अशी आमची मागणी असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असणारं आंदोलन हे केवळ पंजाब, हरियाणापुरतं मर्यादीत नसून ते देशभरातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं.
दुपारी तीन वाजता हे आंदोलनकर्ते मुंबईच्या बांद्रा आंबेडकर गार्डन इथून जीओ गार्डनचा दिशेनं निघाले पण त्यांना २०० मिटर अंतरावरच अडवण्यात आलं. पोलिसांनी शेतकर्याचं आंदोलन अडविले परंतू आंदोलक आक्रमक झाल्यानंतर, पोलिसांना त्यांना थोपवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हा मोर्चा रिलायन्स जिओच्या कार्यालयावर धडकणार होता. केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी हे आंदोलन पुकारलं असून मुंबईत स्वाभिमानी शेतकरी, प्रहार, सीपीआयएम, छात्र भारती आदी संघटना एकत्र येऊन हे आंदोलन केलं. या आंदोलनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी कायद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक आंदोलकांनी डफली वाजवून या कायद्यांचा निषेध केला..