अहमदनगर जिल्ह्यात आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू
अहमदनगर जिल्ह्यात आजपासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे राज्यच्या शिक्षण विभागाच्या मान्यतेनूसार आजपासून अकरावीची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.;
अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात आजपासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे राज्यच्या शिक्षण विभागाच्या मान्यतेनूसार आजपासून अकरावीची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यानुसार विद्यार्थ्यांना 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान संबंधीत महाविद्यालयाना प्रवेश अर्ज भरून देता येणार आहे. त्यानंतर 26 तारखेला अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल. दरम्यान, विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ऑनलाईन अडचण असले त्या ठिकाणी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता मुल्यमापनावर विद्यार्थ्यांना दहावीचे गुण देण्यात आले आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाची टक्केवारी 99.97 टक्के एवढी आहे. दहावीच्या निकालानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने सीईटीची परीक्षा रद्द केली. आणि 11 वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. राज्यात काही ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी काल 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत आदेश काढले. त्यानुसार आजपासून ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक
16 ते 23 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरून द्यावे लागतील.
24 आणि 25 ऑगस्ट दरम्यान अर्जाचे संगणिकरण होईल.
26 ऑगस्ट पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.
27 ऑगस्ट पहिल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवता येईल.
28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
2 सप्टेंबरला पहिली प्रतिक्षा यादी प्रसिध्द होईल.
2 ते 4 सप्टेंबर पहिल्या गुणवत्ता यादीनूसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.
6 ते 9 सप्टेंबर दरम्यान दुसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द होईल.
11 सप्टेंबर तिसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द होईल.
11 ते 14 तिसर्या प्रतिक्षा यादीनूसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.