शिवसेनेचे खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या साप्ताहिक सदरात निवडणूक आयोगाविरोधात अविश्वास दाखवणारा मजकूर लिहिल्यानं निवडणूक अधिकारी तथा मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या ३ एप्रिलपर्यंत हा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
३१ मार्च रोजी सामनाच्या अंकात रोखठोक या सदरात ‘’हे चित्र काय सांगते? देशसेवेची घसरलेली पातळी ! या शीर्षकाखाली ‘EVM घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल’असं वाक्य नमूद केलंय. या वाक्यामुळं ईव्हीएमच्या वापराबाबत अविश्वास दर्शविणे, निवडणूक प्रक्रियेविषयी गढूळ वातावरण निर्माण करणे, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल खुलासा सादर करावा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.