ईव्हीएम मशीनमध्ये नोंदविलेल्या मतांच्या किमान 50 टक्के मतांची व्हीव्हीपॅट मशीनच्या सहायानं पडताळणी करावी, ही देशातील प्रमुख 22 विरोधी पक्षांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावलीय. त्यामुळं संतप्त विरोधकांनी बैठकीदरम्यानच विरोध करायला सुरूवात केली होती.
विरोधकांची मागणी नेमकी काय ?
मतपत्रिका आणायची नसल्यास निवडणूक निकालाच्या वेळी व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची आणि ईव्हीएममधील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करावी आणि विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातल्या व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्या मोजण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. तरीही व्हीव्हीपॅटमधील पावत्या मतमोजणीच्या आधी मोजल्या जाव्यात, अशीही विरोधकांची मागणी आहे. मात्र, आयोगानं विरोधकांच्या मागण्या फेटाळल्यानं संतप्त विरोधकांनी आयोगाच्या कार्यालयाबाहेरही घोषणाबाजी केली.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ गेले होते. शिष्टमंडळानं देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विरोधकांच्या या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन आयोगानं दिलं होतं. मात्र, आयोगानं अखेर विरोधकांची ही मागणी फेटाळून लावलीय.