चोर चौकीदाराला शोधा, काँग्रेसचा नवा प्रचार

Update: 2019-03-31 05:49 GMT

चौकीदारांचे खूप फोटो असलेली एक पोस्ट आज काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून करण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये एकच चोर आहे त्याला शोधू शकता का? असा प्रश्न ही विचारण्यात आला आहे. चौकीदाराच्या गणवेशात काही कार्टून कॅरेक्टर्स काढण्यात आले आहेत आणि त्यात एका कॅरेक्टरला मोदींचा चेहरा लावण्यात आला आहे. सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या स्पर्धांमध्ये साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. याचाच वापर करून काँग्रेसने मोदींच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे.

त्याच बरोबरीने पकडो पकडो चोर को पकडो म्हणून एक गेम सदृश्य व्हिडीयो ही काँग्रेसने जारी केला आहे. या व्हिडीयो मध्ये नरेंद्र मोदींच्या स्वरूपातलं कॅरेक्टर दाखवण्यात आलं आहे.. #EkHiChowkidarChorHai असा ट्रेंड काँग्रेसतर्फे सोशल मिडीयावर सुरू करण्यात आला आहे.

Similar News