राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने महाराष्ट्र स्टेट कॉ. बँक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य मोठ्या नेत्यांवरही या पुर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप पक्ष निवडणुकीपूर्वीच्या शरद पवार यांच्या झंझावाताला घाबरला असल्याचं वक्तव्य आपल्या ट्वीटर अकाउंट वर केलं आहे.
धनंजय मुंडे यांनी "आदरणीय पवार साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय, म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु झालाय." असं म्हटलं आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1176513916211363842