'हे' आहेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

Update: 2019-10-07 11:30 GMT

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात शेती, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/658952934593290/?t=2

पाहुयात काय आहेत या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे:

  • शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार
  • शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्व लक्षात घेता शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
  • विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविणे, परीक्षा आणि निकाल वेळापत्रकांप्रमाणे पार पडण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हक्क आयोग स्थापणार
  • तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
  • उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार
  • नव्या उद्योगात भूमिपुत्रांना ८०% नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा आणणार
  • कामगारांचे किमान वेतन २१ हजार करणार
  • UPSC प्रमाणेच MPSC चे वेळापत्रक निश्चित करणार तसेच या परीक्षेचा निकाल 45 दिवसांत जाहीर करणार
  • अर्धनागरी आणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार
  • राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागा 100 दिवसांत भरण्याची प्रक्रिया सुरू करणार..
  • ‘मनरेगा’अंतर्गत किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करणार
  • राज्यातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत आणणार
  • सर्व महानगरपालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंत असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करणार
  • नव्या मोटार वाहन कायद्यात आकारण्यात येणारा दंड कमी करणार
  • महाराष्ट्रातील दहावी पास दहा लाख तरुणींना पहिल्या वर्षात मोफत लॅपटॉप देण्यात येणार

Similar News