देशात थंडीची लाट , राजस्थानमध्ये पारा शून्याच्या खाली

उत्तर-पश्चिम भारतातील थंडीची लाट बुधवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. तिकडे मध्य प्रदेशात थंडीची लाट लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

Update: 2021-12-21 02:01 GMT

नवी दिल्ली // उत्तर-पश्चिम भारतातील थंडीची लाट बुधवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. तिकडे मध्य प्रदेशात थंडीची लाट लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी सांगितलं की, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट कायम राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम राहील आणि त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रतही दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर सध्या पंजाब, हरियाणा, राजस्थान ,दिल्ली,आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.तिकडे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या काही भागांत उद्या दुपारपर्यंत आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही लाट कमी होण्याची उच्च शक्यता आहे.

22 ते 25 डिसेंबर या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजस्थानच्या बहुतांश भागात थंडी असून चुरू आणि सीकरसह अनेक ठिकाणी किमान तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात आहे.

Tags:    

Similar News