अखेर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध

Update: 2019-10-05 12:41 GMT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची नोटरी संपलेली असल्या कारणाने त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती. या संदर्भात काँग्रेसने यावर आक्षेप घेत सरकार बरखास्तीची मागणी केली होती.

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभेचे उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जाचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जात नोटरी लावलेली आहेत. ती नोटरी इनव्हॅलिड आहे. असा आरोप त्यांनी केला होता.

ज्या वकिलाकडून ती मोठी करण्यात आलेली आहे त्या वकिलाचा कार्यकाळात डिसेंबर २०१८ पर्यंत होता. मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे आणि

पिपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टनुसार देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज बाद झालाच पाहिजे

अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात आज 5 वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्याना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक अर्ज वैध असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समोरील निवडणुकीच्या काळातील मोठा धोका टळला आहे.

https://youtu.be/oajM2-JB1WY

Similar News