अविश्वास ठराव आणावा वाजवून सांगतो किती आमदार आमच्या सोबत आहेत - अजित पवार
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या तोंडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुजा चव्हाण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची घोषणा केली असताना महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर आहे यांच्यामधील नेते घाबरलेले आहेत, संधी मिळाली तर आमदार सोडून जातील या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, `अविश्वास ठराव आणावा वाजवून सांगतो किती आमदार आमच्या सोबत आहेत`, असं प्रतिआव्हान भाजपला दिलं आहे. संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर आता महाविकास आघाडीही आक्रमक होणार असून उद्यापासून कोरोनाच्या संकटात विधीमंडळाच्या रणांगणात सत्ताधारी-विरोधकांच महाभारत पाहायला मिळणार आहे