मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, अखेर महापालिकेनं घेतली गंभीर दखल

Update: 2020-05-08 00:46 GMT

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील सायन ह़ॉस्पिटलमध्ये एका कक्षात ट्रॉलीवर मृतदेह ठेवलेले असून तिथेच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही आता या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या सर्वप्रकारावर सायन हॉस्पिटलतर्फे निवेदन जारी करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या व्हिडिओची सत्‍यता आणि वास्तविकता पडताळण्‍यासाठी एक चौकशी समिती नेमण्याती आली असून २४ तासांच्या आत त्‍याचा अहवाल मागवण्‍यात आला आहे. या चौकशीत दोषी आढळलेल्‍यांवर कारवाई करण्‍यात येणार आहे. याआधीच्या आदेशानुसार कोविड-१९ कक्षातील तसेच संशयित कोविड रुग्‍णांच्‍या कक्षातील मृतदेह, मृत्‍युनंतर ३० मिनिटांमध्‍ये रुग्‍णाच्‍या नातेवाईकांच्‍या ताब्‍यात देण्‍याचे आदेश देण्यात आले होते.

हे ही वाचा...


धक्कादायक! मुंबई सायन हॉस्पिटल मध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही, शव गृहाची क्षमता संपली

कोरोना व्हायरस: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलावली सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीस उपस्थित

सर्वपक्षीय बैठक: कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का?

पण अनेकवेळा रुग्‍णांचे नातेवाईक मृतदेह ताब्‍यात घेण्‍यासाठी येत नाहीत, वारंवार फोन करूनही ते येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे ते मृतदेह शवागारात ठेवण्यात येतात. पण तरीही अशा घटना घडू नये म्हणून सक्त आदेश देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही अशा घटना यापुढे घडू नये यासाठी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही तर महापालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावायची का? याबाबत धोरण ठरवणार असल्याचे सांगितले आहे.

Similar News