महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. शिवसेना आणि भाजपने १२४-१६४ जागा वाटपांवर आपले मतभेद मिटवुन निवडणुकीच्या रिंगणात एकत्र उतरले आहेत. मात्र, युतीच्या जागावाटपांमुळे शिवसेना आणि भाजप पक्षातील अंतर्गत बंडखोरी वाढतच आहे.
पक्षांतर्गत बंडखोरीविषयी बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "बंडखोरी करणाऱ्यांविरोधात पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार असून ७ तारखेपर्यंत बंडखोर नेते आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील" असं म्हटलं आहे.
https://youtu.be/P9dgybfzqJc